
व्हायरल व्हिडिओमध्ये तेजस्वी यादव म्हणत आहेत की, “बघा, आम्ही आत्ताच विमानातून उतरलो आहोत. पण ज्या पद्धतीने जागा वाटप झाली, त्यावरून कोणते खाते कोणाला देतात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून आहे. कोणतेही काम असो, ते व्यवस्थित झाले पाहिजे. बिहारमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. मात्र, हा व्हिडिओ शेअर करताना एका युजर्सने तेजस्वी यादव दारूच्या नशेत असल्याचे बोलले आहे. युजर्सने आपल्या कॅप्शनमध्ये ‘राष्ट्रीय जनता दलाचा रोड रेड नेता. झूम बराबर झूम शराबी’ असे लिहिण्यात आले आहेत. परंतु,या व्हिडिओबाबत तपासणी केली असता हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचे निष्पन्न झाले








