
२०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीएने १६४ (टीडीपी-१३५, जनसेना-२१, भाजप-८) जागा जिंकल्या. तर, पाच वर्षांपूर्वी १५१ जागा जिंकणारा वायएसआर काँग्रेस पक्ष केवळ ११ जागांवर विजय मिळवू शकला. यानंतर सोशलम मीडियावक एक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहे, ज्यात असे सांगितले जात आहे की, ईव्हीएममधील छेडछाडीमुळे वायएसआरसीपी पक्षाचा पराभव झाला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआय चौकशीची माागणी केली जात आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले असून हा व्हिडिओ तब्बल पाच वर्ष जुना असल्याचे समजत आहे.







