Explainer : पवन चक्की उभारण्यासाठी कंपन्या बीड जिल्ह्याला अधिक पसंती का देतात? जाणून घ्या कारण

0
23
Explainer : पवन चक्की उभारण्यासाठी कंपन्या बीड जिल्ह्याला अधिक पसंती का देतात? जाणून घ्या कारण


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या जिल्ह्यात सुरू असलेला पवन चक्की उद्योग सध्या देशभरात सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. मस्साजोग या गावात असलेल्या ‘अवाडा’ कंपनीच्या पवन चक्कीच्या मालकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी गेलेल्या काही आरोपींना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी अटकाव केला होता. याचा राग डोक्यात ठेवून देशमुख यांची निर्घृण हत्या  करण्यात आली. बीड जिल्ह्यातून प्रवास करत असताना अनेक ठिकाणी उंचच्या उंच पवन चक्क्यांचे पाते फिरतानाचे दृष्य नजरेस पडते. मराठवाड्यात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात पवन चक्की प्रकल्प उभारण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात कसा उदयास आला, जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे खंडणीखोर लोक पवन चक्कीच्या या उद्योगात कसे घुसले, हे आपण जाणून घेणार आहोत.



Source link