
४ जुलै रोजी ब्रिटिश मतदारांनी लेबर पार्टीच्या बाजूने प्रचंड बहुमत देऊन आपला निर्णय दिला. ब्रिटनच्या इतिहासात लेबर पार्टीच्या अशा विजयाची नोंद फक्त तीन वेळा, क्लेमेंट ॲटलीच्या नेतृत्वाखाली १९४५ साली, टोनी ब्लेअरच्या नेतृत्वाखाली १९९७ साली आणि आता कीर स्टाररच्या नेतृत्वाखाली झाली आहे.







