EVM विरोधात एल्गार! मारकडवाडीत आज मतपत्रिकेवर मतदान, कर्फ्यू लागूनही गावकरी ठाम

0
14
EVM विरोधात एल्गार! मारकडवाडीत आज मतपत्रिकेवर मतदान, कर्फ्यू लागूनही गावकरी ठाम


Markadwadi Voting : सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थ मतपत्रिकेवर मतदान घेण्यावर ठाम आहे. गावकऱ्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आज मंगळवारी (दि ३) बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ठरवलं आहे. मात्र, या मतदानाला प्रशासनाचा विरोध आहे. हे मतदान होऊ नये यासाठी प्रशासनाने गावात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामस्थ मतदान घेण्यावर ठाम असून गोळ्या घातल्या तरी हे मतदान होणारचं अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ऐवढेच नाही तर दूध का दूध पाणी का पाणी आजच होऊ द्या असे देखील ग्रामस्थांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे रूप आले आहे.



Source link