EPFO Account Holders | EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; अवघ्या चार दिवसांत क्लेम सेटलमेंट | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
EPFO Account Holders | EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; अवघ्या चार दिवसांत क्लेम सेटलमेंट | Navarashtra (नवराष्ट्र)


EPFO

Epfo Auto Claim Settlement News : केंद्र सरकारने ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व खातेधारकांनी केलेला क्लेम आता तीन दिवसांत निकाली निघणार आहे. निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO च्या मदतीने दर महिन्याला काही रक्कम सेव्ह करतात. यालाच आपण पीएफ किंवा ईपीएफ म्हणतो. कर्मचाऱ्यांनी गुंतवलेल्या या पैशांवर सरकार एफडीप्रमाणे व्याज देते. तसेच, कर्मचाऱ्यांनी गुंतवलेला हा पैसा बुडण्याची भीती नसते. तो सुरक्षित असतो. दरम्यान, जमा केलेल्या पीएफमधील काही निधी आपत्कालीन स्थितीत काढता येतो. याच आपत्कालीन निधी काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आता ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंट
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाअंतर्गत खातेधारकांनी केलेले वेगवेगळे क्लेम ऑटोमॅटिक प्रणालीने मार्गी लावले जाणार आहेत. ईपीएफओ खातेधारक शिक्षण, लग्न, घरखरेदी, घरबांधणी यासाठी पीएफ खात्यातील पैसे काढू शकतात. त्यासाठी खातेधारकाला क्लेम करावा लागतो. याच क्लेमची संपूर्ण प्रक्रिया आता ऑटोमॅटिक झाली आहे. याबाबत कामगार मंत्रालयाने सविस्तर सांगितले आहे. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार ईपीएफ योजना, 1952 च्या कलम 68 (शिक्षण आणि विवाह) तसेच 68बी (घरासाठी अॅडव्हानस पैसे) अंतर्गत करण्यात आलेले सर्व दावे ऑटो क्लेम सेटलमेंट फॅसिलिटीच्या मदतीने निकाली काढले जाणार आहेत.






Source link