खडसेंचा पक्षप्रवेश दिल्लीत –
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून अनेक केंद्रीय नेते व मंत्र्यांचे महाराष्ट्रात दौरे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र खडसे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात होणार नसून दिल्लीत होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून पक्षप्रवेशाची वेळ दिली जाणार असून त्यानंतर मी दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणत्याही अटी-शर्थी ठेवल्या नसल्याचे खडसे म्हणाले. माझी जी नाराजी होती, ती दूर झाली असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.