
पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. ACB नं दाखल केलेल्या गुन्ह्यात २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यावर आक्षेप घेण्यात आले आहे. याच प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली आहे.




