
गेल्या वर्षभरापासून सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. तसेच एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात कपात करुन केंद्र सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. तसेच एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात कपात करुन केंद्र सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. खाद्यान्न, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागल्याने स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडून गेले आहे.
केंद्र सरकार या कोलडमडेल्या बजेटला थोडा दिलासा देण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना एक पत्र लिहिले आहे. सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाला जागतिक स्तरावरील किंमती आधारे खाद्यतेलाच्या भावात कपातीचे निर्देश देण्यात आले आहे.










