
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले.
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले.
पालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या घरावर, चेन्नईतील डीएमके खासदाराच्या घरावर तर तेलंगणातील बीआरएस आमदार याशिवाय कर्नाटकातील शिवमोगा येथील डीसीसी बँकेचे चेअरमन यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.








