
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने ज्या मालमत्तांसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामध्ये २,३१० निवासी व व्यावसायिक भूखंड, अपार्टमेंट्स, मनोरंजन पार्कयांचा समावेश आहे. जप्त केलेल्या २,३१० मालमत्तांपैकी आंध्र प्रदेशात २२५४, तेलंगणामध्ये ४३, कर्नाटकमध्ये ११ आणि ओडिशामध्ये २ मालमत्ता आहेत. यापूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सीआयडीने एपीपीडीएफ कायद्यांतर्गत जप्त केलेली मालमत्ता पीडितांना परत करण्यास परवानगी दिली होती.








