
सोमवारी रात्री उशिरा जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे पृथ्वी हादरली. त्याची तीव्रता 6.1 एवढी आहे. अनेक भागात लोकांना घरापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला होता.
नेहमीचं भुंकपाचे धक्के सोसणाऱ्या जपानमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake in Japan ) जाणवले. भूकंपामुळे जपानच्या अनेक कंपन जाणवली. मात्र, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. रिपोर्ट नुसार, जपानच्या इवाते आणि आओमोरी प्रांतात ६.१ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले.
हे सुद्धा वाचा
लोकांना घरापासून दूर राहण्याचा इशारा
जपानमधील भूकंपाने रात्री उशिरा लोकांमध्ये घबराट पसरली होती. अनेक जण स्वतः घराबाहेर पडून रस्त्यावर आले. तथापि, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रीफेक्चरचा उत्तर किनारपट्टी भाग होता. हवामान खात्याकडून सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. तरीही प्रशासनाने काही भागातील लोकांना घरापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.










