
वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर या संस्थेतर्फे दरवर्षी जगभरात अर्थ अवरचे आयोजन केले जाते. त्यानुसार, जगभरातील कोट्यवधी लोक एका तासासाठी त्यांच्या घरातील विद्युत उपकरणांचा वापर थांबवतात. त्यामुळे त्याला अर्थ अवर म्हणतात. यावर्षी अर्थ अवर आज म्हणजेच २३ मार्च २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता सुरू होईल. या एका तासासाठी दिवे आणि विद्युत उपकरणे बंद करण्याचे आवाहन केले जाते. १८ व्या आवृत्तीसाठी १९० देश आणि प्रदेशांतील लोक अत्यावश्यक नसलेले दिवे बंद करून सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी भारताने लक्षणीय सहभाग नोंदविला आणि २५ मार्च रोजी १५० हून अधिक ऐतिहासिक स्थळे, स्मारके, सरकारी इमारती, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट कार्यालयातील वीज पुरवठा एका तासासाठी बंद केला होता.






