
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटात अनेक चर्चित कलाकार झळकले होते. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटातील शाहरुखच्या पात्राचे नाव ‘हार्डी’ आहे. शाहरुख खानसोबतच या चित्रपटात तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाची कथा राजकुमार हिरानी यांनी लिहिली आहे.








