Dunki: दुबईच्या आकाशात दिसली शाहरुखची सिग्नेचर पोज! किंग खानचेही डोळे दिपले

0
16
Dunki: दुबईच्या आकाशात दिसली शाहरुखची सिग्नेचर पोज! किंग खानचेही डोळे दिपले


Dunki Promotional Event: बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कल्ला करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आता शाहरुख खान त्याच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरूख खानचा चित्रपट येतोय आणि त्याचं दुबईत प्रमोशन होणार नाही, असं होणं शक्यचं नाही. सध्या शाहरुख खान ‘डंकी’च्या प्रमोशनसाठी दुबईत पोहोचला आहे. यावेळी दुबईत खास ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. या ड्रोन शोमध्ये शाहरुख खान याची सिग्नेचर स्टेप आकाशात झळकली.



Source link