
फलटण : आज सोमवार दिनांक १७/६/२०२४ रोजी संध्या ५-०० सुमारास फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे काही ठिकाणी रस्ते खचले आहेत ते पूर्वत करण्याचे काम युद्ध पातळीवर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासन करत आहे त्यामुळे फलटण-दहिवडी,फलटण- शिंगणापूर रस्ते बंद झाले असून ओढया नाल्याच्या पुराचे पाणी ओसरत नाही तोपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करावा असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात एका व्यक्तीला वाहून जाताना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण पोलीस स्टेशन फलटण यांनी त्या व्यक्तीस वाचवले आहे.








