धोम- बलकवडी धरणातून शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याचे पाणी सोडावे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
15
धोम- बलकवडी धरणातून शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याचे पाणी सोडावे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण तालुक्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विनंती केली की, धोम- बलकवडी धरणातून शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याच्या पिण्यासाठी पाणी सोडावे. फलटण तालुक्यामध्ये पाण्याची अत्यंत भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रशासनास तातडीने सूचना देऊन पाणी सोडण्याचे आदेश आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आता आठ दिवस पाणी मिळणार आहे.

धोम-बलकवडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याने फलटण तालुक्यातील दुष्काळाची दाहकता थोड्याफार प्रमाणात तरी कमी होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.