फलटणः फलटण नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा, ब्राह्मण गल्ली येथील नागरिकांना धोका निर्माण होत असलेल्या एमएसई बोर्डाच्या डीपी शिफ्टिंग कामाचा शुभारंभ उद्या सकाळी ९:०० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दीपक चव्हाण भूषवणार असून, यावेळी फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राजे गटातील सर्व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
वरील कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे व माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.