
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संध्या नागराळ या रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी लालबहादूर बाकेलाल यादव याच्यासह अन्य तीन लोकांनी संध्या यांच्यावर कैचीने वार करण्यास सुरुवात केली. आरोपी मारहाण करत असल्याने संध्या यांनी आरडाओरड केली. परंतु त्याचवेळी आरोपींनी महिलेकडील मोबाईल आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे. डोंबिवलीहून कोपरला महिला जात असताना ही घटना घडली आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपी लालबहादूर बाकेलाल यादव याला अटक केली आहे.






