Divya Pugaonkar: ‘मुलगी झाली हो’मधील माऊ दिसणार या चित्रपटात, चाहत्यांमध्ये उत्सुकता

0
20
Divya Pugaonkar: ‘मुलगी झाली हो’मधील माऊ दिसणार या चित्रपटात, चाहत्यांमध्ये उत्सुकता


पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. मनू अस्थी संकलक तर चित्रपटाच्या छायांकनची जबाबदारी गौरव पोंक्षे यांनी सांभाळली आहे. शिवाय नाईंटी नाईन प्रोडक्शनचे विजय शिंदे आणि बॉम्बे बरोडा वेब टॉकीज हे या चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर आहेत.



Source link