फलटण भागचा मंडलाधिकारी व तलाठी लाचलतूपचा जाळ्यात जमिनिच्या वाटणीपत्र सातबाऱ्यावर चढविण्यासाठी लाच घेतान रंगेहात पकडले

0
17
फलटण भागचा मंडलाधिकारी व तलाठी लाचलतूपचा जाळ्यात जमिनिच्या वाटणीपत्र सातबाऱ्यावर चढविण्यासाठी लाच घेतान रंगेहात पकडले

फलटण:-वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपतत्राची सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी फलटण तालठी व मंडल अधिकारी यांनी तेरा हजाराची मागणी केली असता तालठी व मंडळ अधिकारी रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपत्र झाले असुन त्याप्रमाणे सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी श्रीमती रोमा यशवंत कदम (वय-३१ वर्ष, पद- तलाठी सजा फलटण, वर्ग-३, रा. मलठण ता. फलटण जि. सातारा) यांनी स्वतःसाठी तीन हजार रुपये व जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय ५३ वर्ष, नोकरी- मंडळ अधिकारी, फलटण भाग, फलटण जि.सातारा वर्ग-३, रा. पुजारी कॉलनी, फलटण ता. फलटण) दहा हजार रुपये अशी एकुण तेरा हजार रुपयांची लाच मागणी केली.

मंडळ अधिकारी जितेंद्र कोंडके व तलाठी रोमा कदम यांचे फलटण चावडी येथे कार्यालय असून दिनांक २५ रोजी दुपारी मंडळ अधिकारी जितेंद्र कोंडके यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम स्वतः त्यांचे सर्कल कार्यालय फलटण येथे स्विकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले असुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक २ ला.प्र.वि. पुणे.विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा पोलीस उपअधिक्षक राजेश वसंत वाघमारे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. सातारा सचिन राऊत, पो.हवा. नितीन गोगावले, गणेश ताटे, पो.कॉ. निलेश येवले, म.पो.कॉ. शितल सपकाळ सर्व ने.ला.प्र.वि. सातारा यांनी केली आहे.