
दरम्यान, नितेश राणे यांनी या गूढ मृत्यूबाबत पुरावे देणार असल्याचे सांगितले. “मला नुकतेच समन्स मिळाले आहे आणि मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की हे खुनाचे प्रकरण आहे. मी मुंबई पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. महाविकास आघाडी सरकारला लपवाछपवी करून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या इतर मित्रांना वाचवायचे होते. माझ्याकडे जी काही माहिती आहे, ती मी पोलिसांना देण्यास तयार आहे.







