Dilip Prabhavalkar Birthday: ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये दिलीप प्रभावळकर यांना कशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका?

0
18
Dilip Prabhavalkar Birthday: ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये दिलीप प्रभावळकर यांना कशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका?


ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. पण, ते त्यांच्या एका व्यक्तिरेखेसाठी कायम लक्षात राहिले. आणि ती व्यक्तिरेखा ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील महात्मा गांधी यांची होती. मात्र, सुरुवातीला दिलीप प्रभावळकर या चित्रपटात महात्मा गांधी साकारणार नव्हते. या चित्रपटातील महात्मा गांधी यांची भूमिका कशी मिळाली याचा किस्सा स्वतः दिलीप प्रभावळकर यांनी सांगितला होता. एकदा या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले होते की, ‘या चित्रपटाशी निगडित अनुभव नेहमीच संस्मरणीय राहतील. माझ्या मेकअपला अडीच तास लागायचे. मला बनावट कान आणि नाक लावावे लागायचे. माझी त्वचा सुरकुत्या निर्माण करण्यासाठी ताणली गेली होती, ज्यामुळे खूप खाज यायची आणि अस्वस्थ वाटायचे.’



Source link