
‘सद्गुरू एंटरटेनमेंट, दीपलक्ष्मी निर्मित’ मनमोहक ‘दिल मलंगी’च्या कथेला खुसखुशीत विनोदाची झालर असून, या चित्रपटातून अलगद सामाजिक संदेश तरुणाईच्या मनात रुजण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम अॅक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. कथाकार स्वप्निल गांगूर्डे यांनी ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर यांच्यासोबत पटकथा लेखन केले असून, संवाद प्रथमेश यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उद्गीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत झळकणार आहेत.








