Dhule Bus Accident : भरधाव खाजगी बसला भीषण अपघात, २० प्रवासी गंभीर जखमी, बचावकार्य सुरू

0
20
Dhule Bus Accident : भरधाव खाजगी बसला भीषण अपघात, २० प्रवासी गंभीर जखमी, बचावकार्य सुरू


मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावर आज भल्या सकाळी उत्तर प्रदेशची पासिंग असलेल्या एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. या घटनेत २० प्रवासी जखमी झाले असून काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त खासजी बस पुण्याहून उत्तर प्रदेशातील गोरखपुरला जात होती. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. खासगी बस अपघातामुळं मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.



Source link