Dhruv Rathee: यू-ट्युबर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल; ओम बिर्ला यांच्या मुलीविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याचा आरोप

0
18
Dhruv Rathee: यू-ट्युबर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल; ओम बिर्ला यांच्या मुलीविरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याचा आरोप


महाराष्ट्राच्या सायबर क्राईम विभागाच्या म्हणण्यानुसार, ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने परीक्षा न देताच लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे @dhruvrahtee नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आले. या प्रकरणी बिर्ला यांच्या नातेवाईकाने भारतीय न्याय संहितेअंतर्गत बदनामी, अपमान आणि खोटे विधान केल्याप्रकरणी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे फेक मेसेज असून ध्रुव राठीचा याच्याशी काहीच संबंध नाही. पॅरोडी अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.



Source link