
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धाराशिवमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भूम तालुक्यातील आंतरगाव येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.







