
Arvind Kejriwal Tergets PM Modi : मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण मी या हुकूमशाहीविरोधात संघर्ष करीत आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पहिले भाषण केले आहे. त्यांनी 21 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, हुकूमशाही, भ्रष्टाचार, देश, विरोधी आघाडी यांच्यावर दोरदार टीका केली आहे.
हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायला हवं होतं. अशा परिस्थितीत ते जिथे-जिथे निवडणूक हरतील तिथे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. आज मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण मी या हुकूमशाहीविरोधात संघर्ष करत आहे.








