
दीपक तिजोरीने १९९०मध्ये महेश भट्ट यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याशिवाय ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’, ‘कभी हा कभी ना’, ‘बादशाह’, ‘वास्तव’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ आणि ‘राजा नटवरलाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनयासोबतच दीपक तिजोरीने यापूर्वी ‘उप्स’, ‘फरेब’, ‘फॉक्स’ आणि ‘दो लफ्जों की कहानी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.