
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोलचा १९९५ मध्ये आलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अवघ्या ४० लाख रुपये खर्चकरून तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०२ कोटींचा व्यवसाय केला होता. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटातील प्रत्येक सीन चाहत्यांना आजही आठवतो, पण तुम्हाला माहित आहे का की चित्रपटाचा क्लायमॅक्स शाहरुख खानने बदलला होता. त्यानंतर निर्मात्यांनी त्यात आणखी काही बदल केले. त्याचा परिणाम असा झाला की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला.