Datta Dalvi Get Bail: ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींना कोर्टाचा दिलासा; पाच अटींवर मुलुंड कोर्टानं केला जामिन मंजूर

0
18
Datta Dalvi Get Bail: ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींना कोर्टाचा दिलासा; पाच अटींवर मुलुंड कोर्टानं केला जामिन मंजूर


दत्ता दळवी हे गेल्या दोन दिवसांपासून कारागृहात होते. यानंतर त्यांना ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. आज कोर्टात जामिनावर सुनावणी दरम्यान, दत्ता दळवी यांनी कोणत्याही समाज आणि समूहा विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेले नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत द्वेष पूर्ण वक्तव्य केले आहे. तर दळवी यांच्या वकिलांनी ४१ अ ची नोटिस न देता, अटक केल्याचे म्हटले. चंदा कोचर केसचा रेफरन्स दळवी यांच्या वकिलांनी कोर्टात दिला. दळवी याचे वय आणि प्रकृती पाहता काही अटी आणि शर्तीवर दळवी यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान कोर्टाने दळवी यांच्यावर प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू केले आहे. मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली असून पोलिसांना सहकार्य करण्याची देखील तांबही दिली आहे.



Source link