
डान्सर, कॉर्डीनेटर आणि कोरिओग्राफर व्यतरिक्त ऑल इंडिया फिल्म आणि टेलिव्हिजन डान्सर असोसिएशनने सुनीलच्या कुटुंबीयांना १ लाख ५० हजार रुपयांची मदत केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गंगेश्वर श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्ही दीड लाख रुपयांची मदत केल आहे आणि प्रोडक्शन हाऊसच्या संपर्कात देखील आहोत. जेणेकरुन त्याच्या कुटुंबीयांची मदत होईल’ असे श्रीवास्तव म्हणाले.







