शरद पवार यांच्या दहिवडी दौरा ; नाना पाटील चौकात स्वागत

0
18
शरद पवार यांच्या दहिवडी दौरा ; नाना पाटील चौकात स्वागत

फलटण :दहिवडी दौऱ्यावर जात असताना बारामती येथील माळेगाव च्या गोविंद बाग या निवासस्थानातून फलटण च्या हद्दीतील मौजे .सांगवी येथे गेली 40 वर्ष मा.पवारसाहेब यांचे गुलाबाचा हार ,एकसुंदर अशी स्वागत कमान कै.सुभाष भाऊ शिंदे फलटण तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सह स्वागत समारंभ चा आजमितीस प्रवास चालू होता मात्र आज दि.7/7/2024 रोजी दु.3.15 च्या सुमारास मा.पवारसाहेब यांच्या दृष्टीला काहीतरी चुकल्याचे जाणवले मात्र फलटण च्या नाना पाटील चौकात आल्यावर स्वताहून दहिवडी दौऱ्यावर जाताना  साहेबांनी मला विचारले आज सांगवी येथे कोणीच नव्हते ,हे ऐकून मनस्वी खुप दुख वाटले ..साहेब पुढील वेळेस हि उणीव भासू देणार नाही ..मात्र साहेब आपल्याला आज गुलाबाचा हार देण्यासाठी सुभाष भाऊ नाहीत त्याच्या कार्यकर्ते कडून स्वीकारा लागेल, साहेबांनी आदरयुक्त हार स्विकारला आज अनेक कार्यकर्ते यांना कै.सुभाष भाऊ ची आठवणी बोलण्यातून, डोळ्यातून व मनातून प्रकर्षाने जाणवल्याचे निदर्शनास येत होते…!
गुलाबांच्या हाराची जबाबदारी सस्तेवाडी चे शिल्पकार श्री.अशोक शेठ सस्ते व मित्रपरिवार व हलगी ,वाजंत्री चे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब गट चे प्रवक्ते श्री.शंभूराज खलाटे यांनी केले ,फटाक्यांची आतषबाजी श्री.चेतन शिंदे व नंदकुमार मोरे मित्रपरिवार यांनी केले .
यावेळेस मा.पवारसाहेब प्रेमी कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
श्री.अक्षय तावरे ,श्री.अविनाश धुमाळ ,श्री.राजेंद्र पाटोळे ,श्री.विजय घोलप ,श्री.बाळासाहेब खलाटे ,श्री.बाबा भोई व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती.