
आपल्या अभिनयाने आणि विनोदाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वातही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. मराठी चित्रपट सृष्टीत ‘विनोदाचा सम्राट’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. केवळ चाहतेच नव्हे, तर दादा कोंडके यांनी कलाकारांच्या मनावरही राज्य केले होते. नुकताच दादा कोंडके यांची ९१वी जयंती साजरी करण्यात आली. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. आजच्या तरूणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो, यातच दादांनी प्रेक्षकांची मने कशी जिंकली आहेत हे दिसून येते. आता दादांचे चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहेत.






