सीरमची लस आफ्रिकन देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली. सायरस पुनावाला आणि त्यांच्या टीमने महामारीचा मुकाबला करण्यासाठी लस कमी पडणार नाही, याची जबाबदारी घेतली होती. लसींच्या क्षेत्रात सायरस पुनावाला यांचे कार्य अतुलनीय आहे. यामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान करणं हे आम्हाला ते योग्य वाटले नाही, पण नंतर त्यांना पद्मभूषण देण्यात आले. आज जगातील नवीन पिढी लसींच्या क्षेत्रात काम करत आहे. त्यांचे योगदान पाहता सरकारने त्यांना पद्मभूषण पुरते मर्यादित न ठेवता त्यांना भारतरत्न दिले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. सायरस पुनावाला व शरद पवारांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी सायरस यांनी पवारांनी राजकारणातून विश्रांती घ्यावी, असा सल्ला दिला होता.







