
Cyclone Remal update : रेमाल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलेआहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया पाच ते सात तास चालणार आहे. या वेळी ताशी ११० ते १२० किमी वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमी पर्यंत पोहोचला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये – उत्तर आणि दक्षिण २४ परांगाना, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिवृष्टी होत आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी – पश्चिम मेदिनीपूर, नादिया, पूर्व बर्दवान येथे सोमवारी मुर्शिदाबादमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.








