CSMIA Airpost | CSMIA ६५,००० हून अधिक हज यात्रेकरूंच्‍या प्रवासाची हाताळणी करण्‍यास सज्‍ज, २०२४ मध्‍ये वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
CSMIA Airpost | CSMIA ६५,००० हून अधिक हज यात्रेकरूंच्‍या प्रवासाची हाताळणी करण्‍यास सज्‍ज, २०२४ मध्‍ये वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा | Navarashtra (नवराष्ट्र)


CSMIA ६५,००० हून अधिक हज यात्रेकरूंच्‍या प्रवासाची हाताळणी करण्‍यास सज्‍ज, २०२४ मध्‍ये वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा

सीएसएमआयए मे २०२४ ते जुलै २०२४ दरम्‍यान आगमन व निर्गमनांसह ६५,००० हून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्‍यास सज्‍ज आहे.

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए) यंदा हज यात्रेमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहे. विमानतळाला मुंबईतून सौदी अरेबियाला प्रवास करणाऱ्या ३३,००० यात्रेकरूंना निर्गमनाची सुविधा देण्‍याची अपेक्षा आहे. सीएसएमआयए मे २०२४ ते जुलै २०२४ पर्यंत आगमन व निर्गमनांसह ६५,००० हून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्‍यास सज्‍ज आहे. या महत्त्वपूर्ण कार्यसंचालनामधून सीएसएमआयएचे भारतातील हज यात्रेसाठी प्रमुख निर्गमन स्‍थळ म्‍हणून महत्त्व दिसून येते. सीएसएमआयए टप्‍प्याटप्‍प्‍याने व समन्‍वयित दृष्टीकोनासह प्रवाशांच्‍या वाढत्‍या रहदारीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास पूर्णपणे सज्‍ज आहे.

वर्ष २०२४ मध्‍ये सीएसएमआयएच्‍या माध्‍यमातून प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंच्‍या आकडेवारीत वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा आहे, तुलनेत २०२३ मध्‍ये विमानतळावरून १२,८१५ यात्रेकरूंनी प्रवास केला होता. सीएसएमआयएवरून वार्षिक हज फ्लाइट्स वर्षभरात दोन महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी कार्यरत असतात. २०२४ साठी डिपार्चर फ्लाइट्स २५ मेपासून सुरू झाल्‍या आहेत आणि १२ जूनपर्यंत कार्यरत राहणार आहे. परत येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन जुलै २०२४ मध्‍ये सुरू होण्‍यासाठी तात्‍पुरते नियोजन करण्‍यात आले आहे.






Source link