
विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतप्त झालेल्या आई-वडिलांनी सासू, सासरे आणि ननंदेला कैद करून घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना प्रयागराजमध्ये सोमवारी रात्री उशिरा घडली. एवढेच नाही तर बाहेरून कोणीही मदत करू नये म्हणून शटरही बंद केले होते.
प्रयागराज : विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतप्त झालेल्या आई-वडिलांनी सासू, सासरे आणि ननंदेला कैद करून घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना प्रयागराजमध्ये सोमवारी रात्री उशिरा घडली. एवढेच नाही तर बाहेरून कोणीही मदत करू नये म्हणून शटरही बंद केले होते. तसेच परिसरातील लोकांनाही मदत करण्यापासून रोखण्यात आले. यात सासू- सासरे यांचा मृत्यू झाला, तर नंनदसह अन्य चार जण गंभीर जखमी झाले.
आग एवढी भीषण होती की, या आगीने आजूबाजूच्या घरांनाही आपल्या कवेत घेतले. मुठीगंजच्या सत्तीचौरा परिसरातील लाकूड व्यावसायिक राजेंद्र केसरवानी यांचा मुलगा अनसूचा विवाह 13 फेब्रुवारी 2023 रोजी झालवा येथील तंबू व्यावसायिक सरदारी लाल यांची मुलगी अंशिकासोबत झाला होता. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास सरदारीलाल यांच्या घरी अंशिका प्रकृती अस्वास्थ्याचा फोन आला. जेव्हा सरदारी लाल आणि त्यांचे कुटुंब सत्तीचौरा येथे पोहोचले तेव्हा त्यांना अंशिका खुर्चीवर पाय लटकलेल्या स्थितीत दिसली.