Congress on CAA : चार वर्षे काय करत होतात?; सीएएची अधिसूचना निघताच विरोधक आक्रमक

0
19
Congress on CAA : चार वर्षे काय करत होतात?; सीएएची अधिसूचना निघताच विरोधक आक्रमक


ममता बॅनर्जी यांचं शांततेचं आवाहन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना शांत राहण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ‘केंद्र सरकारनं ही अधिसूचना सहा महिन्यांपूर्वीच काढायला हवी होती. एखादा निर्णय चांगला असेल तर आम्ही नेहमीच पाठिंबा देतो आणि कौतुकही करतो, परंतु देशाहिताच्या दृष्टीनं एखादी गोष्ट चुकीची असेल तर तृणमूल काँग्रेस नेहमीच आवाज उठवेल आणि त्याला विरोध करेल. रमजान महिना सुरू होण्याच्या बरोबर एक दिवस आधीच अधिसूचना का काढली गेली, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.



Source link