Congress New Headquarter : काँग्रेस पक्षाचे मुख्यालय १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृतरित्या हलविण्यात येणार आहे. तत्पूर्वी २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातून काँग्रेसचा झेंडा खाली उतरवण्यात आला. ४६ वर्षापासून हे काँग्रेसचे मुख्यालय होते. काँग्रेसची नवी इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही पूर्णपणे कॉर्पोरेट स्टाईल आहे. काँग्रेस मुख्यालयाची नवीन इमारत ६ मजली आहे.