Chitan Upadhyay : घटस्फोटित पत्नीच्या खुनाप्रकरणी चित्रकार चिंतन उपाध्याय याला जन्मठेप

0
17
Chitan Upadhyay : घटस्फोटित पत्नीच्या खुनाप्रकरणी चित्रकार चिंतन उपाध्याय याला जन्मठेप


चिंतन उपाध्यायनं त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. घटस्फोट मंजूर झाल्यानं व पोटगीपोटी हेमा उपाध्यायला मोठी रक्कम दिल्यानं चिंतन उपाध्यायनं तिला मारण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा युक्तिवाद चिंतनच्या वकिलांनी केला होता. त्यांना खुनाचा कट रचल्याचा आणि त्यात त्याचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलं होतं. इतर आरोपींच्या वकिलांनी प्रदीप कुमार राजभर यांच्या जबाबावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संपूर्ण सुनावणीअंती न्यायालयानं चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.



Source link