
मराठी चित्रसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचे म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या विषयांवर येणारे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहेत. नुकताच ‘सापळा’ नवाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाच्या नावावरुन काही तरी हटके कथा पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसणार असण्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.








