
चीनने म्हटले आहे की इन्फ्लूएंझा सारखा आजार देशातील बहुतेक मुलांमध्ये पसरत आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला या रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती मागितली आहे.
चीन देशात पुन्हा एकदा गूढ आजाराने रुग्णालये भरली आहेत. चीनने म्हटले आहे की, इन्फ्लूएंझा सारखा आजार देशातील बहुतेक मुलांमध्ये पसरत आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला या रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती मागितली आहे.
अहवालानुसार, चिनी रुग्णालये आजारी मुलांनी भरलेली आहेत. या मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. WHO ने सांगितले की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली.
WHO ने या आजारासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवला आहे. WHO ने आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली आहे. चीनमध्ये आजारी पडण्याच्या अलीकडील घटनांमध्ये कोविड सारखी लक्षणे पुन्हा दिसून येत आहेत.
रुग्णांच्या लांबच लांब रांगा
आजारी मुलांच्या कुटुंबीयांचा हवाला देत एका चिनी वृत्तवाहिनीने सांगितले की, या आजाराची कोणतीही नवीन लक्षणे नाहीत, परंतु मुलांच्या शरीराचे तापमान वाढतच जाते आणि फुफ्फुसात गाठी तयार होतात. चीनमधील रुग्णालयांमध्ये मुलांच्या उपचारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रोग मॉनिटरिंग वेबसाइट प्रोमेड मेल अलर्टने वैद्यकीय कर्मचार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘रुग्णांना 2 तास रांगेत थांबावे लागते आणि आम्ही सर्व आपत्कालीन विभागात आहोत.
चायना डेली मधील एका अहवालात म्हटले आहे की, “चीनमध्ये श्वसन संक्रमणाच्या रोगांचा पीक सीझन आला आहे, ज्यामध्ये लोकांमध्ये अनेक प्रकारच्या रोग विषाणूंची देवाणघेवाण होत आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, “काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे; या आजारामुळे काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.”







