
दिग्गज कलाकार झळकणार!
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात आहेत. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.







