CBSE Result | दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका आता ऑनलाईन तपासता येणार; CBSE ने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
CBSE Result | दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका आता ऑनलाईन तपासता येणार; CBSE ने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)


‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई) ने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील.

नवी दिल्ली : ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई) ने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

सीबीएसईने उमेदवारांना कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर परीक्षकांनी दिलेले गुण तपासू शकतील. लिंक ओपन झाल्यानंतर फक्त पाच दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देखील घेऊ शकतात. यासाठीही अर्ज करावा लागेल. यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिविषय 700 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रति विषय 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.






Source link