
चाहते अनेकदा आपल्या आवडत्या गायकाच्या, रॅपरच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी उत्सुक असतात. लाइव्ह गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ते तुफान गर्दी करतात. या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेक विचित्र प्रकार घडल्याचे समोर येते. असेच काहीसे प्रसिद्ध रॅपर कार्डी बीसोबत झाले होते. तिने थेट रागाच्या भरात चाहतीच्या अंगावर माइक फेकून मारला होता. आता या माइकचा लिलाव झाला असून तो कोट्यावधी रुपयांना विकला गेला आहे.








