Cancer Vaccine : माणूस जगणार, कॅन्सर हरणार! रशियानं कॅन्सरवर बनवली लस! नव्या वर्षापासून नागरिकांना मोफत देणार

0
13
Cancer Vaccine : माणूस जगणार, कॅन्सर हरणार! रशियानं कॅन्सरवर बनवली लस! नव्या वर्षापासून नागरिकांना मोफत देणार


Russia Cancer Vaccine News in Marathi :  जगात विविध दुर्धर आजार आहेत. यात कर्करोग हा गंभीर आजार असून या आजारावर कोणतेही औषध नाही. जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखों नागरिक या आजाराने जीव गामावत आहे. मात्र, आता कॅन्सरवर रशियाने रामबाण उपाय शोधला आहे. नागरिकांना कॅन्सरची लागण होऊ नये यासाठी खास कॅन्सरवरील लस रशियन शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या बाबत जाहीर केले असून ही लस पुढील वर्षांपासून देशातील सर्व नागरिकांना मोफत दिली जाणार आहे.  रशियन सरकारी  वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या बाबत रशियन रेडिओ चॅनेलवर माहिती दिली आहे. 



Source link