
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कांडारकर, प्रशांत कांडारकर आणि नितीन कांडारकर अशी अपघातात ठार झालेल्या भावांची नावे आहेत. तिघे जण एकाच दुचाकीवरून निघाले होते. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. या मृतात दोन सख्खे भाऊ तर तिसरा चुलत भाऊ आहे .तिघेही तरुण मलकापूर तालुक्यातील झोडगा गावचे रहिवासी आहेत. तिघांचा मृत्यू झाल्यानं कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.






