Buldana: बुलढाणा घटनेला नवं वळण, पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही; पोलीसही चक्रावले

0
18
Buldana: बुलढाणा घटनेला नवं वळण, पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही; पोलीसही चक्रावले


पीडित महिला गुरुवारी बुलढाण्यातील मलकापूर मार्गावरील राजूर घाटात मित्रांसोबत फिरायला गेली होती. दरम्यान, राजूर घाटात देवीच्या मंदिर परिसरात सेल्फी काढण्यासाठी थांबले. त्यावेळी आठ जणांचा घोळका त्यांच्याजवळ आला. त्यांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाकडून रोख रक्कम लुटली आणि तिला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, अशी तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा दाखल करण्यात आली होती.



Source link