Building Collapsed | पश्चिम बंगालमध्ये बेकायदा बांधण्यात येत असलेली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Building Collapsed | पश्चिम बंगालमध्ये बेकायदा बांधण्यात येत असलेली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)


पश्चिम बंगालमध्ये बेकायदा बांधण्यात येत असलेली  इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी

ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक रहिवाशांना बेकायदा बांधकामांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील गार्डन रीच परिसरात सोमवारी बेकायदेशीर बांधकामाखालील पाच मजली इमारत कोसळून (Illegally constructed building collapsed) नऊ जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. यानंतर या मुद्द्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. इमारत कोसळून 18 तास उलटले तरी अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अ

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, गार्डन रीचच्या अजहर मुल्ला लेन भागात दाट लोकवस्तीच्या तलावात तलाव भरून बांधण्यात येत असलेली पाच मजली इमारत जवळच्या झोपडपट्ट्यांवर कोसळली. या परिसरात अशा किमान 800 अनधिकृत इमारती असल्याचा दावाही त्यांनी केला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर, पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मोहम्मद वसीमला अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत खून, हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.






Source link